लिटर मापांनी दूध संकलनास विरोध : वैधमापनशास्त्र विभागाला दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:22 AM2018-03-01T01:22:12+5:302018-03-01T01:22:12+5:30
कोल्हापूर : दूधसंकलन वाढल्याने पारंपरिक पद्धतीने लिटर, पाचशे मिलिलिटर या मापांनी दूधसंकलन करणे अडचणीचे असल्याने इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरून दूधसंकलन न करण्याच्या आदेशाला प्राथमिक दूध संस्थांनी विरोध केला आहे. संस्थांची अडचण समजावून घेऊन शासनाने सक्ती करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने बुधवारी या विभागाकडे केली.
प्राथमिक दूध संस्थांमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर दुधाची खरेदी विक्री केली जाते; पण यामध्ये शंभर मिलिलिटरपेक्षा कमी दुधाचे वजन होत नसल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी वैधमापनशास्त्र विभागाकडे केली होती. दुधासह कोणत्याही द्रवरूप पदार्थाचे वजन करता येत नाही, असे कायदा सांगतो. त्यामुळे दूधसंकलन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर करता येणार नाही. त्यासाठी लिटर मापांचा वापर करण्याचे आदेश वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिले आहेत. या आदेशाने प्राथमिक दूध संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली असून, त्यांनी या आदेशाला विरोध केला आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव, दत्तात्रय बोळावे, सुभाष गुरव, आदी उपस्थित होते.
‘गोकुळ’लाही फटका बसणार!
‘गोकुळ’च्या संकलनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच चंदगड, शाहूवाडी, गगनबावड्यासह आजरा तालुक्यांच्या डोंगरमाथ्यावरून दूध चिलिंंग सेंटरवर पोहोचते. संकलनासाठी वेळ झाला तर दुधाच्या वाहतुकीस विलंब होऊन दूध खराब होण्याच्या तक्रारी वाढणार आहेत. त्याचा थेट फटका जरी संस्थांना बसणार असला तरी त्याची झळ ‘गोकुळ’लाही सोसावी लागणार आहे.
शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटणार
वैधमापनशास्त्र विभागाची सक्ती ही संस्थेवर अन्याय करणारी असल्याने हा आदेश रद्द करावा. या मागणीसाठी ‘गोकुळ’सह दूध संस्था कर्मचारीसंघटनेचे शिष्टमंडळ लवकरच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
यांची भेट घेणार आहे.वाढीव दुधाचा उत्पादकांनाच परतावाइलेक्ट्रॉनिक वजनकाट्यामुळे ५१ मिलिलिटर दूध झाल्यास ते १०० मिलिलिटर मोजले जाते; तर ४९ मिलिलिटर असेल तर त्याचे मोजमाप होत नाही; पण या वाढीव दुधामुळे झालेला नफा रिबेट, दूध फरकातून उत्पादकांनाच दिला जातो, असा दावा संस्थांनी केला आहे.
या आहेत संस्थांच्या अडचणी
ूध उत्पादन वाढल्याने वेळेत संकलन होणे अवघड.
तोकड्या पगारावर कोणी काम करण्यास तयार नाहीत.
कर्मचाºयांची संख्या वाढवावी लागणार. पर्यायाने संस्थांवर अतिरिक्त बोजा.
लिटरने दूध मोजताना कर्मचाºयाचे विस्मरण होण्याचा धोका.
संस्थांचे दूधसंकलनापासून दूध बिले वाटपापर्यंतचे काम रेंगाळणार.