स्वाईनचा धोका वाढणार
By admin | Published: March 1, 2015 11:58 PM2015-03-01T23:58:32+5:302015-03-02T00:02:02+5:30
गारठा वाढला : सर्दी-खोक ल्यासह ताप-थंडीला निमंत्रण
कोल्हापूर : जिल्ह्णात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने स्वाईनचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात कमालीचा गारठा पसरला. परिणामी स्वाईनला पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने सर्दी-खोकल्याच्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. थंडी वाजून ताप भरण्याचा प्रकार वाढण्याची शक्यता असून शरीर उबदार ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरासह जिल्ह्णात स्वाईन फ्लू आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. बारा संशयित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या साथीने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यभर स्वाईनच्या संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘सीपीआर’मध्ये स्वाईन फ्लूचे जानेवारी ते आजअखेर १९ रुग्ण होते. अवकाळी पावसामुळे हवेत वाढलेला गारठा स्वाईनला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे. बदलेल्या वातारवणामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांनी क ाळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी दिले आहे.
ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी, अतिसार अशी सर्वसाधारण लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच संबंधितांनी जवळच्या डॉक्टरांकडून निदान करून घ्यावे. प्रामुख्याने स्वाईन फ्लूची लागण झालेला रुग्ण खोकल्यास, शिंकल्यास विषाणूंच्या माध्यमातून होत असते. गर्दीत जाताना नाक व तोंडाला रूमाल बांधा. लागण झाल्यापासून सात दिवसांपर्यंत दुसऱ्याला संसर्ग होत असतो. शिंक, खोकला आल्यास रुमालाचा वापर करावा, वेळेवर उपचार व औषधे घ्या. शरीर उबदार ठेवून सर्दी, खोकला, ताप, थंडीसारख्या नियमित आजारांवरही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
वातावरणातील बदल तसेच फेब्रुवारी-मार्च हा ऋतू बदलाचा काळ असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका बळावतो. त्यातच अवकाळी पावसामुळे अचानक गरमी व थंडीचे वातावरण राहणार आहे. परिणामी दमा, धापेसह श्वसनांचा आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, पाच वर्षांपर्यंत तसेच वृद्ध लोकांना या वातावरणाचा अधिक फटका बसत असल्याने योग्य काळजी घेण्याचे आवाहन डॉ. संदीप नेजदार यांनी केले आहे.