रोहित पवार यांचा कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:43 PM2021-07-29T17:43:31+5:302021-07-29T17:45:01+5:30
Flood Kolhapur : कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना नागरिकांना आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी गुरूवारी जिल्ह्यातील कागल तालुक्यातील काही पूरबाधित गावे आणि शहरातील पुराचा फटका बसलेल्या परिसराला भेट घेवून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेत मदत कार्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
कोल्हापूर : येथील पूरग्रस्तांना नागरिकांना आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी गुरूवारी जिल्ह्यातील कागल तालुक्यातील काही पूरबाधित गावे आणि शहरातील पुराचा फटका बसलेल्या परिसराला भेट घेवून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेत मदत कार्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक आणि बारामती ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना मदत केली. त्यात सोलापुरी चादर २५०० नग, बिस्कीट पुडे २१,४०० पाण्याच्या बॉटल, सॅनिटरी नॅपकिन्स प्रत्येकी २५००, क्लोरीन पावडर १२५ किलो, मॅगी नुडल्स ५००० पॅकेट, माचीस २५०० नग, मास्क २६०० नगांचा समावेश आहे. हे साहित्य कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नावीद मुश्रीफ, इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. पूरग्रस्त भागात मदत पोहोचविण्याच्या कार्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गावे आणि कोल्हापूर शहरातील विविध नुकसानग्रस्त भागांमध्ये भेट देऊन बाधित नागरिकांना धीर दिला.
विविध क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत चर्चा
आमदार ऋतुराज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाला आमदार पवार यांनी भेट दिली. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कशी मदत करता येईल. नागरिकांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने केले. पुनर्वसनासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत अशा विविध विषयांवर सामाजिक, व्यावसायिक, बांधकाम, आदी क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत त्यांनी चर्चा केली.