कागल ग्रामीण रुग्णालयास समरजित घाटगे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:34+5:302021-04-15T04:23:34+5:30

: शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आज कागलच्या ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन ...

Samarjit Ghatge's visit to Kagal Rural Hospital | कागल ग्रामीण रुग्णालयास समरजित घाटगे यांची भेट

कागल ग्रामीण रुग्णालयास समरजित घाटगे यांची भेट

Next

: शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आज कागलच्या

ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा, आरोग्य सेवेचा आढावा घेतला. कागल ग्रामीण रुग्णालयामार्फत कोविड लसीकरणाचे काम उत्कृष्ट चालू असून या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच महिलांच्या लसीकरणाचे जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा जवळपास तिप्पट गतीने रुग्णसंख्या वाढत आहे. कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. तरी येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक लस सर्वच पात्र नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. पहिला व दुसरा डोसही घेऊन सामाजिक कर्तव्य पार पाडावे. शाहू साखर कारखान्यामार्फत चालवण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवर लसीकरण कॅम्प घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, डॉ. रवीद्र बल्लुरगी, डॉ. साधना मदने, डॉ. महेंद्र पाटील, जे. एम. खोत आदी उपस्थित होते.

छायाचित्र-

भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोविड लसीकरणाबद्दल

वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Web Title: Samarjit Ghatge's visit to Kagal Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.