कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड याची पोलीस कोठडी उद्या, बुधवारी संपत आहे. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळवून घेण्याची शक्यता आहे. अद्याप समीर गायकवाड याने पोलिसांना तपासकामात कोण्समीरचे असहकार्य --समीरने तपासकामांमध्ये पोलीस पथकाला अद्याप कोणतेही सहकार्य केले नाही तसेच तो सर्व आरोप नाकारत आहे. त्यामुळे त्याने असहकार्याची भूमिका घेतली आहे. ४समीर गायकवाड याला जामीन मिळवून देण्यासाठी चाचपणी करण्यासाठी गोव्याहून सनातन प्रभातचे वकील उद्या, बुधवारी कोल्हापुरात येणार आहेत. यावेळी ते समीरची भेट मागण्याची शक्यता आहे. ातेही सहकार्य केले नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे, पण त्याच्याकडे चौकशीसाठी कर्नाटक पोलीस, एनआयएचे पथक पोलीस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून आहे. उद्या, बुधवारी समीरची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करून कोठडीत वाढ मागण्यात येणार आहे. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळवून घेण्याची शक्यता आहे.
समीरला उद्या न्यायालयात हजर करणार
By admin | Published: September 22, 2015 12:56 AM