कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत संजीवनी अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणातून चांगले परिणाम दिसून येत आहेत. शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आपण कोरोनाबाधित आहोत हे त्यांनाही माहीत नव्हते. त्यांच्यामुळे इतरांना होणारा संसर्ग टळण्यास मदत झाली.
शुक्रवारी ३७२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात शुक्रवारी व्याधीग्रस्त २७७ नागरिकांपैकी १५ पॉझिटिव्ह व २६२ निगेटिव्ह आढळून आलेत. शुक्रवारी ४२२३ व्याधीग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी ३२२७ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे १४० नागरिक आढळून आले. त्यामध्ये ५२२ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी २६ पॉझिटिव्ह आले, तर १२४२ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. आजच्या अभियानामध्ये १७६४अँटिजन टेस्ट व आरटीपीसीआर करण्यात आले.
महापालिकेच्या १४९ वैद्यकीय पथकाद्वारे रविवार पेठ, जुना वाशी नाका, राजारामपुरी, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, शाहूपुरी, शास्त्रीनगर, यादवनगर, शाहूनगर, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, धनवडे गल्ली, पिंजार गल्ली, त्र्यंबोलीनगर, उलपे मळा, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, विद्या कॉलनी, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, सुभाषनगर, राजोपाध्येनगर, राजे संभाजीनगर, बोंद्रेनगर, सुलोचना पार्क, अंबाई टँक, विचारेमाळ, जाधवावडी, बापट कॅम्प, सदरबाजार, घोडके वाडी, कारंडे मळा, लक्ष्मीपुरी, रायगड कॉलनी, संभाजीनगर येथे हे अभियान राबविण्यात आले.