या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे निर्लेखन झाले आहे. त्यामध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचा अहवाल देऊन चार वर्षे उलटली; पण अद्याप नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच गणपती कांबळे, उपसरपंच नारायण रेडकर, सदाशिव पाटील, कृष्णा पाटील, आनंदा सावंत, शामराव चौगले, अशोक कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांच्या आत इमारत बांधकामासाठी निधी जिल्हा परिषदेने मंजूर केला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या आंदोलनाला सामोरे जा, असा इशाराही सरपंच कांबळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला दिला आहे.
फोटो कोलडेस्कवर पाठवला आहे.