शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

मोर्चादिवशी जिल्ह्यातील शाळांना हवी सुटी

By admin | Published: September 22, 2016 1:08 AM

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, अशी मागणी कोरेगाव विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. त्यामुळे या समाजातील तरुण पिढीला विशेषत: उच्च शिक्षित तरुणांना गुणवत्ता असूनही डावलले जात आहे. मराठा समाजातील मागील पिढी गुणवत्ता असूनही आरक्षणाच्या नावाखाली मागे ढकलली गेली. तसेच गुणवत्ता असूनही हाताला योग्यतेनुसार काम नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे़ परिणामी मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फार मोठा परिणाम मराठा समाजावर झाला आहे़ पुढील पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र येत आहे. आरक्षणासाठी दि. ३ आॅक्टोबरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहोत़ मराठा समाज आरक्षणाची मागणी मुख्यत: पुढील पिढी म्हणजे आताची शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या मोर्चात सहभागी होणे योग्यच आहे़ त्यांना तशी संधी मिळावी यासाठी दि. ३ आॅक्टोबर रोजी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे, दिलीपराव बर्गे, रामचंद्र बोतालजी, संतोष बर्गे, महेश बर्गे, विठ्ठलराव काटे, रोहित जाधव, अनिल बर्गे, अनिल पवार, राजेंद्र बर्गे, अधिक जाधव, विनोद गोरे, अरुणराव बर्गे, श्रीकांत बर्गे, संतोष कदम, चंद्रकांत शिंदे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी) जावळीतील मुस्लीम समाजाचा मोर्चाला पाठिंबा कुडाळ : जावळी तालुक्याच्या कुडाळ परिसरातील साठ गावांची मराठा मोर्चासाठी बैठक झाली. या मोर्चाला जावळी तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दि. ३ आॅक्टोबर मराठ्यांची राजधानी सातारा येथे ‘न भूतो न भविष्यती’ असा मोर्चा करण्याचा संकल्प यावेळी जावळीकरांनी केला. या मोर्चाला सहकार्य व जाहीर पाठिंबा जावळीतून करण्याचा निर्णय जावळीतील मुस्लीम समाजाने घेतला आहे. कुडाळ येथील गजानन मंगल कार्यालय येथे मराठा समाजाची बैठक झाली. ‘मराठा समाज हा मुस्लीम समाजाचा मोठा भाऊ आहे,’ असे मुस्लीम बांधवांनी म्हटले. मराठा क्रांती मोर्चास ‘रिपाइं’चा पाठिंबा वाठार स्टेशन : ‘आपल्या न्याय हक्कासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा काढून मागणी करणे हा घटनेने दिलेला अधिकार असून, त्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवून सामाजिक दरी निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आपण आपल्या कार्यकर्त्याबरोबर मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहे,’ असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी जाहीर केले आहे. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वत:ची घरे भरणाऱ्या नेतेमंडळींकडून मराठा समाजाचा अपेक्षा भंग झाला आहे. महाराष्ट्रात निघत असलेले मोर्चे त्याचे प्रतीक आहेत. कोपर्डीची घटना निश्चितपणे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो याशिवाय अशा गुन्हेगारास कुणीही पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारांना कोणतीही जात नसते विनाकारण जातीय तेढ वाढू नये. या मोचार्ला प्रति मोर्चा काढून जसास तसे उत्तर देण्याची तयारी होत असल्याची माहिती मिळत आहे. माझे सर्व दलित संघटना आणि बांधवांना आवाहन आहे की, आपण असे करू नये असेही आवळे यानी म्हटले आहे. (प्रतिनिधी)