कोगनोळीत शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 05:50 PM2021-04-19T17:50:06+5:302021-04-19T17:51:02+5:30
Crimenews Kognoli kolhpaur : कोगनोळी येथील काशीद गल्लीतील पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. स्वाती बाळासाहेब काशीद असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता नववी मध्ये शिकत होती.
कोगनोळी : येथील काशीद गल्लीतील पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. स्वाती बाळासाहेब काशीद असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता नववी मध्ये शिकत होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, स्वातीचा भाऊ व आई काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. वडील बाळासाहेब हे मेडिकल स्टोअरमधून औषधे आणण्यासाठी गेल्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून स्वातीने दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी कोगनोळी आऊट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम सूर्यवंशी, हवलदार राजू खानापनावर यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या घटनेची माहिती कळताच तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश पाटील, प्रवीण पाटील, योगेश चौगुले यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. लहान वयात या मुलीने आत्महत्या केल्याबद्दल नागरिकातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.