कोविशिल्डचा आज दुसरा डोस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:28+5:302021-05-10T04:24:28+5:30
कोल्हापूर : कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ४५ वर्षांवरील नागरीकांना आज, सोमवारी महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण करण्यात येणार ...
कोल्हापूर : कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ४५ वर्षांवरील नागरीकांना आज, सोमवारी महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक ६ ते १० मे पर्यंत ज्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेली आहे अशांनाच कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
कोणाचे होणार लसीकरण?
४५ वर्षांवरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण होणार.
- कोठे होणार लसीकरण ?
महापालिका प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर व मोरे माने नगर या ठिकाणी.
- कोणाचे होणार लसीकरण -
दिनांक ६ ते १० मे पर्यंतची ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतली आहे अशा नागरिकांना कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार आहे.
- लस कोणाला दिली जाणार नाही?
४५ वर्षांवरील ज्या नागरिकांची ऑनलाईन अपॉईंटमेंट नाही त्यांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही.
फक्त १९४ नागरिकांना दिली लस -
शहरात रविवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये एकूण १९४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाडिक माळ येथे एकाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले.