शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या बॅचमधील इलेक्ट्रिकलच्या १०, इलेक्ट्रॉनिक्सच्या २, मेकॅनिकलच्या १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इन्फोसिस, याझाकी इंडिया, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, बजाज ऑटो, वेव्ह सस्पेन्शन आदी नामवंत कंपनीत त्यांच्या निवडी झाल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संचालक डॉ. सतीश पावसकर, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. डिप्लोमानंतर चांगल्या कंपनीत नोकरी मिळण्यासाठी विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. मुलांच्या गुणवत्तात्मक व कौशल्यपूर्ण विकासासाठी स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे.
आतापर्यंत महाविद्यालयाच्या ६५० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यात संधी मिळाली आहे. उज्ज्वल करिअरसाठी डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचे आवाहन कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर यांनी केले आहे.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले.