बावेली येथील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:26 AM2021-09-21T04:26:01+5:302021-09-21T04:26:01+5:30
१९ वर्षांखालील कबड्डी प्रकारात साहिल विश्वास म्हस्कर,रवींद्र अंकुश कदम यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर ४०० मी धावणेमध्ये स्नेहल सुरेश पारकर ...
१९ वर्षांखालील कबड्डी प्रकारात साहिल विश्वास म्हस्कर,रवींद्र अंकुश कदम यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर ४०० मी धावणेमध्ये स्नेहल सुरेश पारकर हिने सुवर्णपदक मिळवले. तसेच ८०० मीटर धावणेमध्ये नितीन सदाशिव महाडेश्वर याने कांस्यपदक पटकावित घवघवीत यश संपादन केले. या सर्वांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वांची निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक दिनकर वि. म्हस्कर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कोट....
आम्ही ग्रामीण भागात कोणत्याही भौतिक सोयी सुविधा उपलब्ध नसताना प्रतिकूल व खडतर परिस्थितीत या सर्वांना प्रशिक्षण दिले. भविष्यात त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.
दिनकर मस्कर, प्रशिक्षक
..............
या चारही यशस्वी खेळाडूंचे पालक अल्पभूधारक शेतकरी असून मोलमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचे प्रशिक्षणही स्थानिक प्रशिक्षकांकडून अत्यल्प सोयीसुविधावर घेतले आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यासाठी येणारा खर्चही त्यांना पेलणारा नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थानी त्यांना मदत केल्यास देशाचे नाव मोठे होईल.
२० बावेली
बावेली - जयपूर येथे पार पडलेल्या यूथ गेम स्पर्धेतील बावेली गावचे यशस्वी खेळाडू.