'शरद'च्या सात विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:47+5:302021-05-25T04:26:47+5:30
जनरल इलेक्ट्रिक इव्हिएशन ही कंपनी हेल्थकेअर, पॉवर, रिन्युएबल, ट्रार्न्स्पोटेशन, लायटनिंग, कॅपिटल या क्षेत्रातील उत्पादने तयार करते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ...
जनरल इलेक्ट्रिक इव्हिएशन ही कंपनी हेल्थकेअर, पॉवर, रिन्युएबल, ट्रार्न्स्पोटेशन, लायटनिंग, कॅपिटल या क्षेत्रातील उत्पादने तयार करते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इव्हिएशन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. कंपनी विमानाचे इंजिन्स व त्याचे पार्टही तयार करते.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टिट्युड ट्रेनिंग, टेक्निकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. तसेच सध्या इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असल्याची माहिती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांचे सहकार्य लाभले.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-१०-यशस्वी विद्यार्थी