कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या बचावासाठी चित्रपट व्यावसायिकांचे गेल्या २८० दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी आज, शुक्रवारी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट झाली.कोल्हापूरच्या सिनेसृष्टीची परंपरा व भालजी पेंढारकर यांच्या कार्याची साक्ष असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या बचावासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, चित्रपट व्यावसायिक व रंगकर्मींच्या वतीने गेल्या २८० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. अखेर चित्रपट व्यावसायिकांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलन तीव्र करू व सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. गुरुवारी (दि.२०)चित्रपट व्यावसायिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले होते; पण त्यांची भेट झाली नाही. या प्रश्नाबाबत जिल्हा प्रशासनाची उदासीनता जाणवली त्यामुळे त्यांनी आज शुक्रवारी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
कोल्हापूर: जयप्रभा स्टुडिओसाठी आत्मदहनचा प्रयत्न, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:19 PM