शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

कळंबा कारागृहातील प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:20 AM

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत आज, शुक्रवारी अप्पर पोलीस महासंचालक ...

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत आज, शुक्रवारी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली. गुरुवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी केली.

सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी तीन गठ्ठे कारागृहातील संरक्षण भिंतीवरून आत फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले. हे गठ्ठे मंगळवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षकास मिळाले. गठ्ठ्यामध्ये पाऊण किलो गांजा, नवे दहा मोबाईल संच, पेनड्राईव्ह, मोबाईल कॉड आदी साहित्य सापडले होते. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदल्याने खळबळ उडाली. याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू झाली. चौकशीसाठी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे आज, शुक्रवारी कोल्हापुरात येत असून ते कारागृहाला भेट देऊन चौकशी करणार आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून कारागृहातील सर्व बराकची झडती घेतली. दीड महिन्यात दुसऱ्यांदा प्रकार घडल्याने ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पॅरोलवरील कैदी कारागृहात परतत आहेत. त्यातूनच प्रकार घडल्याची शक्यता कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी व्यक्त केली.

रजेवरुन थेट पुण्याकडे

आठवडाभर कळंबा कारागृहाचे अधीक्षक शेळके हे घरगुती कामानिमीत्त रजेवर होते. गांजा, मोबाईलचा प्रकार घडल्यानंतर शेळके यांना अप्पर पोलीस महासंचालक रामानंद यांनी बोलवून घेतल्याने ते रजेवरुन थेट पुण्याकडे रवाना झाले. रामानंद यांनी शेळके यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत चौकशी केली.

चौकशीसाठी मोबाईल कंपनीशी पत्रव्यवहार

जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारागृहात जाऊन घटनास्थळाची पहाणी केली, काहीं कर्मचारी व कैद्यांकडे चौकशी केली. सापडलेले मोबाईल कोणाच्या नावावर खरेदी केले या माहितीसाठी मोबाईल कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. सीसीटिव्ही मध्ये कैद झालेल्या संशयितांच्या चारचाकी वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. जप्त पेनड्राईव्हची अद्याप तपासणी केली नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.