Maharashtra Election 2019 : शिरोळ विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 04:43 PM2019-10-21T16:43:17+5:302019-10-21T17:43:41+5:30
शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी प्रमुख चौरंगी लढत होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत ५२.७६ टक्के मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान झाले.
शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी प्रमुख चौरंगी लढत होत असून दुपारी चार वाजेपर्यंत ५२.७६ टक्के मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान झाले.
दुपारी एक वाजेपर्यंत या मतदारसंघात ३७.०८ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे नऊ वाजेपर्यंत अवघे ७ टक्के मतदान झाले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत २१.३२ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत ३ लाख १२ हजार ७३२ पैकी १ लाख १५ हजार ९५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतदारांना ने-आण करण्यासाठी काही केंद्रावर वाहनांची सोय करण्यात आली होती. शिरोळ येथील केंद्र शाळेसमोर पावसाचे पाणी साचल्यामुळे नगरपालिकेच्या टँकरने मोटारीव्दारे पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मतदारांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग मोकळा करुन देण्यात आला.