सिंगलसाठी सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:53+5:302021-02-18T04:40:53+5:30

उत्तूर : छत्रपती युवा ग्रुपतर्फे उत्तूर आयोजित शिवजयंती सोहळ्याचे आयोजन उद्या (गुरुवार)पासून करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ...

For singles for singles | सिंगलसाठी सिंगलसाठी

सिंगलसाठी सिंगलसाठी

Next

उत्तूर : छत्रपती युवा ग्रुपतर्फे उत्तूर आयोजित शिवजयंती सोहळ्याचे आयोजन उद्या (गुरुवार)पासून करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी जनावरांचे मोफत आरोग्य शिबिर व पाळीव श्वानांना मोफत अँटिरेबीज लसीकरण, सायंकाळी रांगोळी स्पर्धा, शुक्रवारी (१९) पहाटे ५ वाजता छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक, शिवज्योत आगमन व हळदी-कुंकू कार्यक्रम, शनिवारी महाआरोग्य शिबिर होईल.

-------------------------

२)

संतोष चौगुले यांची ‘लेफ्टनंट कर्नल’पदी निवड

गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील सुपुत्र संतोष सखाराम चौगुले यांची भारतीय लष्करात मेजर पदावरून लेफ्टनंटपदी पदोन्नती झाली. चौगुले हे २००० मध्ये भारतीय लष्करात भरती झाले आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग ‘लखनौ’ येथे असून, त्यांचे माध्यमिक शिक्षण साधना विद्यालय गडहिंग्लज, तर महाविद्यालयीन शिक्षण शिवराजमध्ये झाले आहे.

-------------------------

३)

राजगोळीत कामगार संघटनेची स्थापना

चंदगड : राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील क्वॉलिटी अ‍ॅनिमल फिडस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये पुणे येथील शिवगर्जना कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटना फलकाचे अनावरण शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांच्या हस्ते झाले.

संदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पांडुरंग गावडे, रवींद्र परीट, नवनाथ जाधव, मोहन गावडे, सुधीर कडूकर, विनायक निर्मळकर, सागर पाटील, संतोष जाधव उपस्थित होते. शिवगर्जना कामगार संघटनेची कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच शाखा आहे. यावेळी कामगारांनी जुन्या संघटनेचे सामूहिक राजीनामे दिले.

Web Title: For singles for singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.