पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला सहाजणांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:01 PM2021-03-22T17:01:51+5:302021-03-22T17:03:46+5:30
dog Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी येथील सरस्वती मार्केट व लायकर गल्ली याठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहाजणांचा चावा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना आयजीएम रुग्णालयात, तर आणखीन तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
इचलकरंजी : येथील सरस्वती मार्केट व लायकर गल्ली याठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहाजणांचा चावा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना आयजीएम रुग्णालयात, तर आणखीन तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
शारदा फाटक (वय २९, रा. सरस्वती मार्केट), स्वप्नाली गोलंगडे (३७) व सुभाष माने (६८, दोघे रा. लायकर गल्ली) यांच्यावर आयजीएम, तर अन्य तिघांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, यासंदर्भात विविध संघटनांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपालिकेस केली आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालिकेने एका कंपनीस ८० लाखांचा ठेका दिला आहे. त्याचा कोणताच फरक पडला नसल्याचे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.