व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांच्या घरातील सहा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:38 AM2021-06-07T10:38:49+5:302021-06-07T10:40:58+5:30

corona virus Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने संजीवनी अभियानाअंतर्गत माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात असून यामध्ये रविवारी शहरातील १३६ व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी सहा व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

Six positives in the home of a diseased student | व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांच्या घरातील सहा पॉझिटिव्ह

 कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरात माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांच्या घरातील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कसबा बावडा परिसरातील तपासणीवेळी भेट दिली. यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमाझा विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान तपासणीच्या ठिकाणी प्रशासक बलकवडे यांची भेट

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने संजीवनी अभियानाअंतर्गत माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात असून यामध्ये रविवारी शहरातील १३६ व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी सहा व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

या तपासणीच्या दरम्यान प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सदरबाजार व कसबा बावडा या ठिकाणी असलेल्या व्याधीग्रस्त कुटुंबाच्या तपासणी वेळी भेट दिली. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी बाजारगेट, जोशी गल्ली, कुंभार गल्ली याठिकाणी तपासणी दरम्यान भेट दिली. यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने शहरातील ४८३ व्याधीग्रस्त बालकांची यादी तयार केली आहे. या यादीमधील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचा सर्वेक्षण व तपासणी करण्यात येत आहे. व्याधीग्रस्त बालकाच्या कुटुंबातील व्यक्तींची सहा मिनिटे ेवॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोविड टेस्ट, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत.

या अभियानाअंतर्गत रविवारी व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबातील ६४४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३६ कुटुंबातील ६४४ बालकांसह नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये १४३ नागरिकांची ॲंन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये सहा पॉझिटिव्ह आढळून आले तर १३७ जण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. तसेच १८२ नागरिकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली. या अभियानात ४३ वैद्यकीय पथके काम करत आहेत.

Web Title: Six positives in the home of a diseased student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.