संकेश्वरात रूद्रभूमीच्या मार्गाचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:20+5:302021-05-25T04:26:20+5:30
शहरात लिंगायत बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रूद्रभूमीजवळ खासगी लोकांची शेतजमीन आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण ...
शहरात लिंगायत बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रूद्रभूमीजवळ खासगी लोकांची शेतजमीन आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो. एखादी व्यक्ती मृत पावल्यास व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास जाण्यास मोठी कसरत करावी लागते. ही बाब अनेकदा निदर्शनास आणूनही त्याकडे पालिकेने कानाडोळा केला आहे.
दरम्यान, वर्षभरापूर्वी ए. जे. नलवडे यांनी पालिकेला याबाबत निवेदनही दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नदीगल्ली हिंदू स्मशानभूमीपासून नदीशेजारी अर्धगोलाकार भराव टाकून पी. बी. रोडपर्यंत मार्ग करावा, त्यासाठी जमीन संपादित करावी लागत नाही. हिराशुगर ते बाजारपेठेत येण्यास मार्ग हा जवळचा होईल. तसेच स्मशानभूमी व रूद्रभूमीस मार्ग सुलभ होईल. मात्र, पालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.