जखमी सांबरावर उपचार करण्याऐवजी तोडली शिंगे, लपविली घरात न्यायालयाने सुनावली कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:25 PM2020-04-17T17:25:41+5:302020-04-17T17:53:28+5:30
मलकापूर -: ... शाहूवाडी तालुक्यातील कोतोली जंगलात जखमी अवस्थेत असणाऱ्या साबंराची शिंगे कुऱ्हाडीने तोडुन आपल्या घरी लपवून ठेवणाऱ्या संश ...
मलकापूर -: ... शाहूवाडी तालुक्यातील कोतोली जंगलात जखमी अवस्थेत असणाऱ्या साबंराची शिंगे कुऱ्हाडीने तोडुन आपल्या घरी लपवून ठेवणाऱ्या संश हित आरोपी भास्कर शंकर आनुते , श्रीकांत विलास सांळुखे रा . कोतोली पैकी सोनारवाडी ता . शाहूवाडी या दोघांना वन विभागाने अटक केली . शाहूवाडी न्यायालयासमोर आज त्यांना हजर केले असता त्यांना दि 2० एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली ,
कोतोली जंगलात चार दिवसा पूर्वी कुत्र्यांनी साबं राला जखमी केले होते . जखमी साबंर जंगलात पडले होते . याची माहिती मिळताच भास्कर आनुते , श्रीकांत साळुखें या दोघांनी साबंराची शिंगे कुन्हाडीने तोडुन घरी लपवून ठेवली होती . याची माहिती वना विभागाचे वनपारी क्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी घटनास्थळी भेट देवून दोघांना ताब्यात घेतले त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . याकामी वन विभागाचे वनसरंक्षक हनुमत धुमाळ , सहायक वनसरंक्षक सुनील निकम , वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे वनपाल संजय कांबळे , वनरक्षक जाली दंर कांबळे , दिग्वीजय पाटील आदी सह वनकर्मचारी यांनी सहकार्य केले .