सातारा : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. सातारा जिल्ह्यातही विविध मार्गाने निषेध करण्यात येत आहे. पळशी येथे नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळा व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले. फलटणमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून संताप व्यक्त केला तसेच पुसेगाव येथेही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुसेगाव : पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना पुसेगाव, ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी चौकात श्री सेवागिरी नागरिक संघटना व पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष व श्री सेवागिरी संघटनेचे नेते डॉ. सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप जाधव, माजी उपसरपंच संतोष जाधव, योगेश देशमुख, संतोष तारळकर, दिलीप बाचल, गुलाबराव वाघ, महादेव जामदार, हितेश फडतरे व पुसेगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटणमध्ये शिवसैनिकांनी झेंडा जाळला फलटण : काश्मीरमधील पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यामध्ये १९ जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानी झेंडा जाळूनही शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विराज खराडे, दक्षता समिती सदस्य दशरथ चांगण, शहर प्रमुख विजय मायने, उपतालुका प्रमुख सुभाष जाधव, मनोज गोसावी, माउली पिसाळ, माउली चव्हाण, सतीश दळवी, चंद्र्रकांत सूर्यवंशी, युवा सेनेचे आदित्य गायकवाड, सचिन चव्हाण, स्वप्नील मुळीक, अमित तांबे, अमोल माळवादकर, महिला संघटक सुशीला जाधव उपस्थित होते. दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला केला. यामध्ये १८ जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. पाकिस्तानला आता एकदाच धडा शिकवावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
सैनिकांचा जिल्हा पेटून उठला...
By admin | Published: September 22, 2016 1:04 AM