राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:47+5:302021-04-15T04:23:47+5:30
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ...
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पक्षाच्या सर्व फ्रंट व सेलच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या सुरुवातीला पक्षाच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळेत १६२ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर, पदवीधर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगाणे, कल्पेश चौगले, बाळासाहेब खैरे, सुहास पाटील, अनिरुद्ध गाडवी, कृष्णात पुजारी, संतोष धुमाळ, एम. जे. पाटील, रामराव इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब खैरे यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या हस्ते देण्यात आले.
फोटो ओळी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी पक्षाच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. (फाेटो-१४०४२०२१-कोल-एनसीपी)