कागल : श्रीनाथ सहकार समूहातील सर्वच संस्था स्वभांडवलाने स्वयंपूर्ण झाल्या आहेत. एकवीस वर्षांची ही वाटचाल सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी, कर्मचारी वर्गाने दिलेल्या पूर्ण सहकार्याने यशस्वी झाली आहे. सामान्य माणसाची पत वाढविण्याचे काम श्रीनाथ समूहाने केले आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष चद्रंकात गवळी यांनी केले.
श्रीनाथ पतसंस्था, श्रीनाथ दूध संस्था आणि श्री छत्रपती शिवाजी वाहनधारक पतसंस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील कै.उमेश गवळी सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्वागत सचिव संजय चव्हाण यांनी केले. विषयपत्रिकेचे वाचन वाहनधारक पतसंस्थेचे अध्यक्ष महेश गवळी यांनी केले. यावेळी भिकाजी रेळेकर, वि. म. बोते, शामराव पाटील, रामचंद्र पाटील यांची मनोगते झाली. सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष जयसिंगराव कोकाटे, वाहनधारकचे उपाध्यक्ष आनंदराव वास्कर, दूध संस्थेचे उपाध्यक्ष गंगाराम शेवडे, एस. डी. पाटील, दिनकर प्रभावळकर, शिवाजी पाचगावे, शहाजी पाटील बाळासो हेगडे, हणमंत हुशारे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार सचिव मुनीर हुज्जुखान यांनी मानले.
फोटो कॅपशन
कागल येथील श्रीनाथ सहकार समूहाच्या २१ व्या वार्षिक सभेत संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांनी मार्गदर्शन केले.