कोल्हापूर , दि. १४ : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नासाठी एस.टी. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रलंबित मागण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पाच संघटनानी १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. मात्र,शनिवारी कामगार न्यायालयाने संपाला स्थगिती दिली असली तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये संप होणारच अशी भूमिका एस.टी संघटनेने घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचारयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात, या मुख्य मागणीसाठी संप पुकारला आहे.
आपल्या न्याय हक्कांसाठी मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटना, एसटी वर्कस कॉग्रेस इंटक ,विर्दभवादी कामगार संघटना , महाराष्ट्र मोटर कामगार संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या हंगामात संपामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.
गेली अठरा महिने अधिकारी, परिवहनमंत्री यांच्या बरोबर चर्चा करण्यात गेली पण त्यांनी त्यातून काही समाधानकारक मार्गे काढला नाही. यंदाही आम्ही विना पगारवाढ होता करत आहे. संपाची माहिती प्रत्येक लोकप्रतिनिधी, परिवहनमंत्री, मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवली आहे तरी त्यातून मार्गे न निघाल्याने आम्ही बेमुदत संपावर जात आहे.- हेमंत काशिद,इंटक, आगार सचिवकामगार न्यायालयांची स्थगितीहा संप १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून केला जाणार आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेने पुकारलेल्या या संपाच्या विरोधात एस टी महामंडळाने कामगार न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कामगार न्यायालयाने २६आॅक्टोबरपर्यंत या संपाला स्थगिती दिली आहे.