बालिंगा पंपिंग स्टेशन येथे स्थायी समिती सभापतींचे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:25 PM2019-07-13T16:25:02+5:302019-07-13T16:26:35+5:30
गेल्या तीन दिवसांपासून शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडून बालिंगा पंपिंग स्टेशन येथील बिघाडाचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी बालिंगा पंपिंग स्टेशन येथे जाऊन ठाण मांडले. जोपर्यंत बिघाड दुरुस्त होत नाही, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. ते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडून बालिंगा पंपिंग स्टेशन येथील बिघाडाचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी बालिंगा पंपिंग स्टेशन येथे जाऊन ठाण मांडले. जोपर्यंत बिघाड दुरुस्त होत नाही, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. ते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.
बालिंगा पंपिंग स्टेशन येथील मशिनरी वारंवार खराब होत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये चार वेळा या मशिनरीमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद होऊन परिणामी नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे.
शुक्रवारीही मशिनरीमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने संतप्त झालेले स्थायी समितीचे सभापती देशमुख हे रात्री साडेदहाच्या सुमारास नगरसेवकांसह पंपिंग स्टेशन येथे गेले. त्यांनी या ठिकाणी ठाण मांडले. जोपर्यंत मशिनरीमधील बिघाड दुरुस्त होत नाही, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी परिवहन समितीचे सभापती अभिजित चव्हाण, नगरसेविका वनिता देठे, दीपा मगदूम, शिवानंद बनछोडे, आदी उपस्थित होते.