स्टार ११६५.. २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष, जंतनाशक गोळ्या दिल्या का..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:37+5:302021-09-16T04:31:37+5:30
कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष असल्याचे जाहीर केले आहे. आपल्याकडे आरोग्य विभागाच्या वतीने शाळा ...
कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष असल्याचे जाहीर केले आहे. आपल्याकडे आरोग्य विभागाच्या वतीने शाळा आणि अंगणवाड्यांच्या माध्यमातून या गोळ्यांचे वितरण करण्यात येते. मात्र सध्या शाळा आणि अंगणवाड्या सुरू नसल्याने या गोळ्यांच्या वितरणावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीच या गोळ्यांबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडे विचारणा करण्याची गरज आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. जंतनाशक गोळ्यांचे वितरण योजनाही गेली अनेक वर्षे सुरू आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे शाळा बंद असल्याने गोळ्या वाटप १०० टक्के झालेले नाही.
चौकट
वयाच्या १९ व्या वर्षांपर्यंत गोळ्या
मुला-मुलींच्या वाढीच्या वयामध्ये म्हणजे १९ व्या वर्षांपर्यंत या जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. विशेषत: महिलांसाठी या गोळ्यांचे अधिक महत्त्व असते. वयाच्या १८ व्या वर्षांनंतर मुलींचे होणारे विवाह, गर्भधारणा, त्यातून होणारी शरीराची हानी या सर्व बाबींचा विचार करून या गोळ्या आधीपासून देणे हिताचे ठरते.
चौकट
काय आहे जंतदोष
शरीरामध्ये पाच ते सहा प्रकारच्या कृमी तयार होतात आणि त्या छोट्या आणि मोठ्या आतड्यांना चिकटून बसतात. रक्त शोषून घेऊन या कृमी जगत असल्याने शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी राहते. खाल्ले जाणारे अन्नही पूर्णपणे उपयुक्त ठरत नाही. म्हणून या गोळ्यांच्या माध्यमातून जंत अशक्त केले जातात.
चौकट
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. यासाठी सर्व प्रकारच्या शाळांचे माध्यम उपयुक्त ठरते. शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून या गोळ्यांचे वितरण करण्यात येते.
चौकट
यांच्याकडे साधा संपर्क
शाळा बंद असल्यामुळे जर मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नसतील तर पालकांनी गावपातळीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
कोट
आरोग्य विभागाच्या वतीने नियमितपणे ठरलेल्या वेळापत्रकानुसार जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. मात्र शाळा बंद असल्याने घरोघरी गोळ्या वाटप सुरू आहे. पालकांनीही याबाबत विचारणा करून पाल्यांना या गोळ्या द्याव्यात.
डॉ. योगेश साळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५०९२०२१ कोल स्टार ११६५ डमी