मैदानांसह जलतरण तलाव सुरू करा : वीरधवलने केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 04:13 PM2020-10-20T16:13:56+5:302020-10-20T16:18:27+5:30
Aditya Thackrey, Swimming, kolhapurnews गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मैदाने, जलतरण तलाव बंद आहेत. सरावाअभावी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे ती लवकर सुरू करावी, अशी मागणी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोमवारी भेट घेऊन केली.
कोल्हापूर : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मैदाने, जलतरण तलाव बंद आहेत. सरावाअभावी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे ती लवकर सुरू करावी, अशी मागणी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोमवारी भेट घेऊन केली.
यावेळी झालेल्या चर्चेत वीरधवल याने कोरोनाच्या कहरानंतर कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून पाश्चिमात्य देशात विशेषत: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आदी देशांमध्ये जलतरण तलाव, जीम, मैदाने सुरू झाली आहेत. त्यात ऑलिम्पिकसह सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी तेथील जलतरणपटू जोमाने करीत आहेत. माझ्यासह अन्य जलतरणपटूंची ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे.
मात्र, भारतात विशेषत: मुंबईसह राज्यात एकही जलतरण तलाव खास आमच्यासारख्या जलतरणपटूंना सरावासाठी उपलब्ध नाही. ज्याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने नेमबाजीसाठी शूटिंग रेंज उपलब्ध करून दिली. त्याप्रमाणे जलतरणपटूंनाही सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम व अटी लागू करून जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी द्यावी. यावेळी आंतरारष्ट्रीय जलतरणपटू संदीप शेजवळसह अन्य जलतरणपटू उपस्थित होते.