अमृता पाटील राज्यात मुलींत दुसरी अंकिता पाटील तिसरी : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:05 AM2018-01-09T01:05:50+5:302018-01-09T01:07:18+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षक पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोल्हापुरातील अमृता गणपती पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षक पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोल्हापुरातील अमृता गणपती पाटील यांनी मुलींच्यामध्ये राज्यात दुसरा, तर अंकिता अशोक पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षकच्या ३०० पदांसाठी २४ सप्टेंबरला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातून जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यामध्ये कोल्हापुरातील राजेंद्रनगर हौसिंग सोसायटी येथे राहणाºया अमृता गणपती पाटील यांनी राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. बायोटेकमधून पदविका घेतली आहे.
द युनिक अकॅडमीच्या अंकिता अशोक पाटील यांनी राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला. माजी सैनिक संवर्गमध्ये अकॅडमीचे अमृत शिवाजी पाटील यांनी राज्यात चौथा क्रमांक पटकाविला, तर अजय पाटील यांनी राज्यात खुल्या संवर्गातून चौथा क्रमांक पटकाविला. या तिघांना युनिक अकॅडमीचे संचालक शशिकांत बोराळकर यांचे मार्गदर्शन लाभले. अरुण नरके फौंडेशनचे रामलिंग सूर्यवंशी यांनी एसटी कॅटॅगिरीतून राज्यात नववा क्रमांक पटकावला.
पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील किरण आनंदराव पाटील यांनी खुल्या गटातून राज्यात बाविसावा क्रमांक पटकावला. सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.
या परीक्षेत यश मिळणार याबाबत आत्मविश्वास होता. स्पर्धा परीक्षेसाठी सलग बारा तास अभ्यासाचे नियोजन केले होते. यामध्ये सकाळी, दुपारी आणि रात्री असे वेळापत्रक केले आहे. सेल्फ स्टडीवर जास्तीकरून भर दिला आहे. अभ्यासासाठी मला जॉर्ज क्रुझ यांचे मार्गदर्शन लाभले. - अमृता पाटील