ग्रामीण महिला बचत गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:06+5:302021-04-17T04:24:06+5:30
कोल्हापूर : उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण महिला बचत गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स, मिळून ...
कोल्हापूर : उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण महिला बचत गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स, मिळून साऱ्याजणी, चैतन्य संस्था व सारथी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीने ही स्पर्धा होत आहे. याअंतर्गत बचत गटाला मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्रे, बातम्या, कात्रणे, व्यवसाय, उत्पादनाचे फोटो, सामाजिक उपक्रम, मिळालेले पुरस्कार यांची माहिती अर्जांसोबत द्यावी लागणार आहे. स्पर्धेसाठी कोणताही कार्यक्रम किंवा सादरीकरण, प्रवास, खर्च, स्टाॅल असे काहीही करायचे नाही. पहिल्या तीन बचतगटांसाठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, १० हजार व उत्तेजनार्थ तसेच नवोदित गटांसाठी तीन हजारांची तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. काही महिलांना उत्पादन, मार्केटिंग, व्यवसाय व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. निवडक महिलांच्या यशोगाथा मिळून साऱ्याजणी मासिकात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. अधिक माहितीसाठी दक्षिण भारत जैन सभेची पदवीधर संघटना, जैन बोर्डिंग ३७,महावीरनगर, आमराईजवळ, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.