पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:27 AM2021-09-24T04:27:50+5:302021-09-24T04:27:50+5:30

तुरंबे : मानधन वाढविण्यासाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण भागातील शासनाचा मुख्य ...

Statement for Police Patil's honorarium increase | पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीसाठी निवेदन

पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीसाठी निवेदन

Next

तुरंबे : मानधन वाढविण्यासाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन

देण्यात आले. ग्रामीण भागातील शासनाचा मुख्य दुवा म्हणून पोलीस पाटील आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु पोलीस पाटलांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांना किमान पंधरा हजार रुपये मानधन द्यावे यासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन देण्यात आले.

अर्जुनवाडा (ता. राधानगरी ) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी राज्यमंत्री देसाई आले होते.

येत्या दोन आठवड्यात बैठक घेऊन याबाबत निर्णय देण्याचे आश्वासन संघटनेला दिले.

यावेळी विभागीय अध्यक्ष डी.एस.कांबळे, जिल्हा अध्यक्ष एम.एम.पाटील, कागल तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पोवार, उपाध्यक्ष राजेश कुंभार, बाजीराव रोडे, रमेश ढवण, राजेंद्र रेपे, पिराजी कांबळे आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी :

पोलीस पाटील संघटनेने गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना मागणीचे निवेदन देताना पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी.

Web Title: Statement for Police Patil's honorarium increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.