हेरले येथे ३ ते ७ मे कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:15+5:302021-05-03T04:18:15+5:30
ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी गावातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी, खासगी ...
ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी गावातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी, खासगी दवाखान्यातील उपचार घेणारे आजारी संशयित रुग्ण, खासगी डॉक्टरांमार्फत माहिती घेऊन त्यांची ही अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून गावांमधील वरील घटकांच्या टेस्ट झाल्यामुळे कोरोना संसर्ग फैलाव वेळेत रोखता येईल. कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक हजार अँटिजेन टेस्ट कीटच्या मागणीसह दररोज २५० कोरोना प्रतिबंध लसीची मागणीही केली आहे.
तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व खासगी दवाखाने, सर्व औषधे दुकाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी सॅनिटायजरची फवारणी पुढील पंधरा दिवस केली जाणार आहे. या उपाययोजनामुळे कोरोना संसर्ग फैलाव रोखता येईल. त्यामुळे गावांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी होऊन गाव पूर्णपणे कोरोनामुक्त होईल.
या बैठकीस सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, सदस्य मज्जीद लोखंडे, आदिक इनामदार, शरद आलमान, बटुवेल कदम, दादासो कोळेकर, सदस्या अपर्णा भोसले, विजया घेवारी, स्वरूपा पाटील, आरती कुरणे, शोभा खोत, पोलीस पाटील नयन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, ग्रामसेवक संतोष चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.