येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये वाढत्या कोरोना संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी सरपंच शोभा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
ब्रेक द चेनअंतर्गत शासनाने सुरू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण व विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यास शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे. दुकाने, आस्थापना यांनी नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. एकनंतर मेडिकल सेवा वगळता संपूर्ण गाव लॉकडाऊन केले जाणार आहे. मंगळवारपासून गावात दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार असून अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते एकपर्यंतच सुरू राहील, तर मेडिकल सुविधा २४ तास सुरू राहील. आठवडा बाजार बंद राहणार आहे. परंतु भाजी विक्रीसाठी सकाळी सात ते एक या वेळेत भागात फिरून भाजीपाला विक्री करण्यास मुभा आहे, आदी निर्णय बैठकीत घेतले.
बैठकीस उपसरपंच सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, माजी पं. स. सदस्य प्रमोद पाटील, मंडलाधिकारी जे. आर. गोनसाल्विस, तलाठी एस. डी. पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार, ग्रा.पं. सदस्य मधुकर मणेरे, सुधीर लिगाडे, वैशाली कदम, स्वाती काडाप्पा, समीर जमादार, सुलोचना कट्टी, सुधाराणी पाटील, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, बी. डी. पाटील, डॉ. ज्योती गणे, आसिफ मोमीन उपस्थित होते.