शिरोळच्या विकासासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:06 AM2021-02-20T05:06:12+5:302021-02-20T05:06:12+5:30
शिरोळ : जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी विशेष पुढाकार घेतला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात ...
शिरोळ : जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी विशेष पुढाकार घेतला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भरीव विकास निधी आणून तालुक्याचा कायापालट करू, अशी ग्वाही खा. धैर्यशील माने यांनी दिली.
शिरोळ येथे खा. धैर्यशील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खा. निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. यावेळी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील-टाकवडेकर, आदित्य पाटील-यड्रावकर, गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, बाळासाहेब भांदिगिरे, पं. स. सभापती कविता चौगुले, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, पराग पाटील, तालुकाध्यक्ष वैभव उगळे, सतीश मलमे, चंद्रकांत मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो - १८०२२०२१-जेएवाय-११
फोटो ओळ - शिरोळ येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खा. निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. धैर्यशील माने, उल्हास पाटील, पराग पाटील, वैभव उगळे, अमरसिंह पाटील, कविता चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.