एसटीची केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:25 AM2021-05-18T04:25:28+5:302021-05-18T04:25:28+5:30
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन पुकारला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन पुकारला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, आरोग्य विभाग, खासगी वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे दिवसभरात गडहिंग्लज, मुरगुड, कुरुंदवाड, गारगोटी, शाहूवाडी, इचलकरंजी या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील २० फेऱ्या झाल्या, तर जिल्ह्यातील ११ आगारात १० बसेस रुग्णवाहिका म्हणून कार्यरत आहेत, तर ७०० बसेस विविध आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
फोटो : १७०५२०२१-कोल-एसटी
ओळी : लाॅकडाऊनमुळे एस. टी. वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील आगारामध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या.
(छाया : आदित्य वेल्हाळ)