Kolhapur: जगद्विख्यात फ्रीस्टाईल फुटबॉलर जेमी नाईटच्या करामतींनी विद्यार्थी अचंबित

By सचिन भोसले | Published: November 3, 2023 04:25 PM2023-11-03T16:25:46+5:302023-11-03T16:26:02+5:30

मानेवर चेंडू व अंगा खांद्यावर चेंडू काही मिनिटे रेंगाळत ठेवण्याचे दोन गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड

Students are amazed by the magic of world famous freestyle footballer Jamie Knight | Kolhapur: जगद्विख्यात फ्रीस्टाईल फुटबॉलर जेमी नाईटच्या करामतींनी विद्यार्थी अचंबित

Kolhapur: जगद्विख्यात फ्रीस्टाईल फुटबॉलर जेमी नाईटच्या करामतींनी विद्यार्थी अचंबित

कोल्हापूर : फुटबाॅलवर प्रचंड नियंत्रण आणि त्यावरील करामतीत जगदविख्यात विश्वविक्रमवीर सर्वाधिक मागणी असलेला व्यावसायिक फुटबाॅल फ्रीस्टाईलर जेमी नाईट ने कोल्हापूरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलला शुक्रवारी भेट दिली. या भेटीत त्याने नेक फ्लिक्ट, डोक्यावर स्पीन, ब्लाॅईंड हिल अशा फुटबाॅलवर नियंत्रण ठेवणाऱ्या करामती सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना अचंबित केले.

जेमी हा सर्वाधिक मागणी असलेला सर्वोत्तम व्यावसायिक फुटबाॅल फ्रीस्टाईलर्स पैकी एक आहे. त्याने जागतिक ब्रॅंडसह काम करीत जगभरात प्रवास केला आहे. जेमीने ८० हजार लोकांसमोर २०१७ मध्ये युईएफए चॅम्पियन्स लिग अंतिम खेळपट्टीवरील करामती सादर केल्या आहेत. रोनाॅल्डीनोचा चाहता असलेला या फुटबाॅलरच्या नावावर ब्लाॅईंट हिल आणि नेक फिट म्हणजे मानेवर चेंडू व अंगा खांद्यावर चेंडू काही मिनिटे रेंगाळत ठेवण्याचे दोन गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डस नावावर आहेत. 

पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या देशभरातील १४१ शाळांमध्ये जेमीचे खास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी जेमीने ८.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत२६० विद्यार्थी-विद्यार्थीनींना खास फुटबाॅलवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. त्याच्या करामती पाहून उपस्थित विद्यार्थी अचंबित झाले. वाहवा आणि टाळ्यांच्या वर्षाव त्याच्या सादरीकरणावर झाला. यावेळी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर. उपप्राचार्य मनिषा अमराळे, ज्योती गाला, अभिजीत परब आदी मान्यवर उपस्थित होते.

जेमीच्या सादरीकरणाने विद्यार्थी अचंबित

जेमीने फुटबाॅल डोक्यावर स्पीन करून दाखविला. त्यासोबतच हातावर, खांद्यावर, आर्म, गुडघ्यावर जगलिंग, सींग बोन अर्थात पिंडरीवर, थाॅईज अशा सर्वांगावर फुटबाॅल न पाडता काहीकाळ फिरवून (स्पीन) करून दाखविला. त्याच्या या करामती पाहून विद्यार्थ्यांसह उपस्थित अचंबित झाले.


सरावातील सातत्यामुळे जगातील कुठलीही गोष्ट साध्य करता येते. त्यामुळेच मी दोन गिनीज रेकाॅर्ड करू शकलो. मी तर वयाच्या दहाव्या वर्षांपासून फुटबाॅलवर नियंत्रण मिळवण्याचा सराव करीत आहे. प्रत्येकाचे एक पॅशन असते, त्यात रममाण झाला की ती गोष्ट साध्य करता येते. - जेमी नाईट, फ्रीस्टाईल फुटबाॅलर

Web Title: Students are amazed by the magic of world famous freestyle footballer Jamie Knight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.