विद्यार्थ्यांना दुबार गुणपत्रिका ऑनलाईन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:13+5:302021-07-08T04:17:13+5:30

दुबार गुणपत्रिकेचे ऑनलाईन सुविधा (studentapps.unishivaji.ac.in/suksfc) लिंकसह (online.unishivaji.ac.in) या पेजवर (students online applications) या टॅबवरही उपलब्ध असणार आहे. या सेवेमुळे ...

Students will get double marks online | विद्यार्थ्यांना दुबार गुणपत्रिका ऑनलाईन मिळणार

विद्यार्थ्यांना दुबार गुणपत्रिका ऑनलाईन मिळणार

Next

दुबार गुणपत्रिकेचे ऑनलाईन सुविधा (studentapps.unishivaji.ac.in/suksfc) लिंकसह (online.unishivaji.ac.in) या पेजवर (students online applications) या टॅबवरही उपलब्ध असणार आहे. या सेवेमुळे विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा खर्च, वेळ वाचणार आहे. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागेवर गुणपत्रिका उपलब्ध होऊ शकणार आहे. यापुढील काळात विद्यार्थीभिमुख अन्य सेवांचेही टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, संगणक केंद्राच्या प्रभारी संचालक स्वाती खराडे, आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दुबार गुणपत्रिका घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी लागत असे. यात विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा खर्च होत असे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने ऑनलाईन संगणक प्रणाली स्वनिर्मित केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारास ऑनलाईन अर्ज सादर करणे, पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरणे या बाबी ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार विद्यार्थ्यास दुबार गुणपत्रिकेची सॉफ्ट कॉपी नोंदणीकृत ई-मेलवर तातडीने पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणे त्याची मूळ दुबार गुणपत्रिका अर्जदाराकडून विहीत शुल्क आकारून त्याने नोंदविलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे किंवा हस्ते दिली जाईल.

फोटो (०७०७२०२१-कोल- ऑनलाईन गुणपत्रिका) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी विद्यार्थी सुविधा केंद्राच्या दुबार गुणपत्रिका ऑनलाईन पोर्टलचे लोकार्पण कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी अमित कुलकर्णी उपस्थित होते.

070721\07kol_1_07072021_5.jpg

फोटो (०७०७२०२१-कोल-दुबार गुणपत्रिका) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी विद्यार्थी सुविधा केंद्राच्या दुबार गुणपत्रिका ऑनलाईन पोर्टलचे लोकार्पण कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी अमित कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Students will get double marks online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.