राष्ट्रीय क्रमवारीत भारती कॉलेज ऑफ फार्मसीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:12+5:302021-09-13T04:24:12+5:30
केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिग फेमवर्क (एनआयआरएफ)च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी ...
केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिग फेमवर्क (एनआयआरएफ)च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरने देशात ४९ वे, तर राज्यात ८ वे स्थान पटकावले. राष्ट्रीय क्रमवारी यादीमध्ये सलग सहा वेळा स्थान पटकाविलेले शिवाजी विद्यापीठ संलग्नित एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व
सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची ही पोचपावती असल्याचे तसेच डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विश्वजित कदम, डॉ. एच. एम. कदम, पालक, विद्यार्थी व उद्योजक यांच्या पाठबळामुळे हे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन . मोरे यांनी केले.
या यादीत समाविष्ट झाल्याने आजपर्यंत महाविद्यालयास एक कोटी रुपयांचा संशोधन निधी मिळालेला आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे मान्यता प्राप्त पीएच.डी. संशोधन केंद्र आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन . मोरे, उपप्राचार्य डॉ. एम . एस. भाटीया तसेच एनआयआरएफचे मुख्य समन्वयक डॉ. एन .आर .जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यवाह डॉ . विश्वजीत कदम, कुलपती .डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. एच. एम. कदम यांनी अभिनंदन केले.