केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिग फेमवर्क (एनआयआरएफ)च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरने देशात ४९ वे, तर राज्यात ८ वे स्थान पटकावले. राष्ट्रीय क्रमवारी यादीमध्ये सलग सहा वेळा स्थान पटकाविलेले शिवाजी विद्यापीठ संलग्नित एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व
सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची ही पोचपावती असल्याचे तसेच डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विश्वजित कदम, डॉ. एच. एम. कदम, पालक, विद्यार्थी व उद्योजक यांच्या पाठबळामुळे हे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन . मोरे यांनी केले.
या यादीत समाविष्ट झाल्याने आजपर्यंत महाविद्यालयास एक कोटी रुपयांचा संशोधन निधी मिळालेला आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे मान्यता प्राप्त पीएच.डी. संशोधन केंद्र आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन . मोरे, उपप्राचार्य डॉ. एम . एस. भाटीया तसेच एनआयआरएफचे मुख्य समन्वयक डॉ. एन .आर .जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यवाह डॉ . विश्वजीत कदम, कुलपती .डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. एच. एम. कदम यांनी अभिनंदन केले.