जिल्ह्यात तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण : डॉ. योगेश साळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 03:52 PM2020-10-20T15:52:35+5:302020-10-20T15:54:36+5:30
coronavirus, zp, kolhapurnews कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दुसऱ्या फेरीच्या सर्वेक्षणाचे सोमवारी ६९ हजार ५९२ घरांचे आणि तीन लाख पाच हजार २६५ इतक्या लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
ठळक मुद्देजिल्ह्यात तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण : डॉ. योगेश साळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दुसऱ्या फेरीच्या सर्वेक्षणाचे सोमवारी ६९ हजार ५९२ घरांचे आणि तीन लाख पाच हजार २६५ इतक्या लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरासह सर्व नगरपालिका, तसेच बारा तालुक्यांत सर्वेक्षण सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील ११ हजार ६२० घरांचे व ४८ हजार ६०६ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.