मलकापूर : वीकेंड लॉकडाउन कालावधीत पर्यटनासाठी निघालेल्या वाहनधारकांसह पर्यटकांची आणि विनामास्क धारकांची शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने मलकापूर पोलीस चौकीत स्वॅब तपासणी करण्यात आली. तर विनामास्क फिरत असलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. शनिवार-रविवार सुटीचे निमित्त साधून पावसाळी वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची गर्दी वाढू लागले आहे. शहरात प्रवेश केलेल्या पर्यटकांसह नागरिकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. यामुळे पर्यटकांची चांगलीच धावपळ उडाली होती.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक कोळगे, मलकापूर नगर परिषदेचे ए. के. पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड, नगर परिषदेचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी सहभागी झाले होते.