लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : कोरोना काळातील वीज बिले भरली नाहीत म्हणून वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिला. शिष्टमंडळाने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शाखा अभियंता श्रुती वैद्य यांना मागण्यांचे निवेदन दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज बिलांची होळी केली.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोर्चा काढून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या लाॅकडाऊन काळातील लोकांना रोजगार नसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. लाॅकडाऊन काळातील वीज बिले माफ करून उर्वरित काळातील वीज बिले टप्प्याने भरून घ्यावीत, वीज कनेक्शन तोडू नयेत, तोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊन स्वाभिमानीकडून तत्काळ तोडलेली कनेक्शन्स जोडण्यात येतील, असा इशारा दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, विभाग प्रमुख संपतराव पवार, शिवाजी आंबेकर, जावेद मुल्ला, नितीन कांबळे, संपत रूपणे, अक्षय कांबळे, अरुण पाटील, संजय रूपणे, पांडुरंग कुंभार, नामदेव पाटील, कृष्णात मोहिते, रघुनाथ भोसले, आदी उपस्थित होते.
१८ पारगाव स्वाभिमानी
फोटो ओळी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महावितरण शाखा अभियंता श्रुती वैद्य यांना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.