महिला कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:23 AM2021-05-01T04:23:53+5:302021-05-01T04:23:53+5:30

कोल्हापूर : फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर माजी उपमहापौर व त्यांच्या समर्थकांनी लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याबद्दल त्यांच्यावर ...

Take action against those who beat up female employees | महिला कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा

महिला कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा

Next

कोल्हापूर : फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर माजी उपमहापौर व त्यांच्या समर्थकांनी लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शुक्रवारी भारतीय जनता पक्षातर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे करण्यात आली.

लसीकरणावर ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांनाच प्राधान्य देऊन लस द्यावी, वशीलेबाजी व दबावतंत्र करून रांगेत उभारलेल्या नागरिकांना त्रास दिला जात आहे. अशा पद्धतीच्या घटना लसीकरण केंद्रावर होणे गंभीर बाब आहे. त्यामुळे माजी उपमहापौरांसह समर्थकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Take action against those who beat up female employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.