परवाना, बॅच,रिक्षासह या परमीट घेऊन जा
By admin | Published: June 21, 2017 03:50 PM2017-06-21T15:50:27+5:302017-06-21T15:50:27+5:30
ज्याच्याकडे परवाना, बॅच त्याला मिळणार तात्काळ ; अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसणार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २१ : ज्याच्याकडे रिक्षा चालविण्याचा परवाना, बॅच आणि जो कोणी नवीन रिक्षा र्घेईल त्याला त्वरीत परमीट दिले जाईल. अशी माहीती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.डी.टी.पवार दिली.
शासनाच्या या निर्णयामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसणार आहे. राज्यशासनाने १७ जूनपासून याबाबतचा निर्णय दिला असून त्यात आता ज्याला रिक्षा व्यवसाय करायचा आहे. त्याला तात्काळ परमीट दिले जाणार आहे. व्यवसायातील स्पर्धेमुळे १९९७ साली परमीट वाटप बंद केले होते. त्यानंतर वाढत्या मागणीमुळे २०१२ साली शासनाने रद्द झालेली परमीट पुन्हा जीवंत करण्यासाठीचे आदेश काढले त्यानूसार कोल्हापूरात ४७७७ परमीटसाठी १५०० चालकांनी अर्ज केले होते.
प्रत्यक्षात १०५० परमीट मिळाली. यात निकष महत्वाचे ठरले. ज्यांना पुर्वीचे परमीट हस्तांतर करायचे आहे, अशांना ५००० रुपयांचा दणका आहे. पाच वर्षानंतर परमीट नुतनीकरण करायचे असल्यास ५०० रुपये शुल्क आकारणी होणार आहे. मुदतीनंतर पासिंग करायचे असल्यास ५० रुपये प्रत्येक दिवसाला दंड आकारणी होणार आहे. गेल्या वर्षभरात वाढत्या स्पर्धेमुळे व्यवसाय होत नसल्याने अनेकांनी आपली परमीट भाड्याने अथवा विकली आहेत. त्यामुळे परमीट दिली तरी रिक्षा वाढतील असे अनेक व्यवसायिकांना वाटत नाही.