तारेवाडीनजीकच्या पर्यायी पुलास मंजुरी

By admin | Published: February 27, 2015 10:14 PM2015-02-27T22:14:55+5:302015-02-27T23:20:06+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : तीन कोटी ७७ लाखांचा निधी

Tarevadi's alternative bridge sanctioned | तारेवाडीनजीकच्या पर्यायी पुलास मंजुरी

तारेवाडीनजीकच्या पर्यायी पुलास मंजुरी

Next

गडहिंग्लज : नेसरी-बेळगाव मार्गावरील घटप्रभा नदीवरील तारेवाडी गावानजीकच्या धोकादायक वळणावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक प्रस्तावित पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी नाबार्डच्या अर्थसहायातून तीन कोटी ७७ लाख ४० हजारांचा निधी शासनाने मंजूर केला. त्यासाठी टोकण निधी म्हणून ९० लाख ५८ हजारांची तरतूद करण्यात आली.‘लोकमत’ने ९ डिसेंबर २०१४ च्या अंकात या धोकादायक पुलासंदर्भात आवाज उठविला होता. नेसरी व कोवाड परिसरातील दळणवळणाच्यादृष्टीने हा प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचा होता. याप्रश्नी स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही जोरदार पाठपुरावा केला. त्यास अखेर यश मिळाले.घटप्रभा नदीला पावसाळ्यात येणाऱ्या महापुरामुळे या पुलावरील वाहतूक ८ ते १५ दिवस ठप्प होत होती. त्यामुळे त्या भागातील जनजीवन वारंवार विस्कळीत होण्याबरोबरच शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या पुलानजीक पर्यायी पुलाचा प्रस्ताव तयार केला होता. नाबार्डकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर निधी मंजूर केला.

वचनपूर्तीचे समाधान
स्व. कुपेकर यांनी तारेवाडीनजीकच्या धोकादायक पुलाच्या ठिकाणी पर्यायी पूल व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. चंदगड मतदारसंघातील वाहतुकीच्यादृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपणही त्यासाठी आग्रही पाठपुरावा केला. पावणेचार कोटींच्या निधीसह शासनाने मंजुरी दिली. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता झाली, याचे समाधान वाटते. - संध्यादेवी कुपेकर, आमदार

९ डिसेंबर २०१४ च्या अंकात ‘लोकमत’ने धोकादायक तारेवाडी पुलाच्या प्रश्नास वाचा
फोडली होती.

Web Title: Tarevadi's alternative bridge sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.