शिक्षकांचा पगार सीएमपी प्रणालीचा पाठपुरावा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:26 AM2021-05-07T04:26:56+5:302021-05-07T04:26:56+5:30
गडहिंग्लज : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचा पगार सीएमपी प्रणालीद्वारे करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही जि. प. उपाध्यक्ष सतीश ...
गडहिंग्लज : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचा पगार सीएमपी प्रणालीद्वारे करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सीएमपी प्रणालीची मागणी आहे. यासंदर्भात संघटनेच्या गडहिंग्लज तालुका शाखेच्या शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचे पगाराचे बिल मंजूर झाल्यावर त्याच दिवशी पैसे खात्यावार जमा होणार आहेत. सर्व शिक्षकांचा पगार एकाचवेळी होईल. पेपरलेस व वेळेत काम होईल, तसेच सीएमपी प्रणालीमध्ये आयएफसी कोड असणाऱ्या कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर पगार जमा होऊ शकतो. त्यासाठी एकाच बँकेत खाते हवे असे बंधन असणार नाही.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनीही पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून यासंदर्भात चर्चा केली. उपाध्यक्ष पाटील यांनी तत्काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी संपर्क साधून सीएमपी प्रणालीबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शिष्टमंडळात, संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश हुली, विकास पाटील, बसवराज अंकली, दीपक माने, संदीप माने, सुरेश दास, दशरथ सुतार, आदींचा समावेश होता.