शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

शिक्षकांचा एसएससी बोर्डावर मोर्चा

By admin | Published: January 11, 2017 12:35 AM

पात्र शाळांना अनुदान द्या : कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : मूल्यांकनात पात्र झालेल्या शाळांची यादी घोषित करून त्यांना तत्काळ १०० टक्के अनुदान द्यावे. कायम विनाअनुदानित कालावधीतील सेवा वरिष्ठ वेतन, निवृत्ती वेतनासाठी ग्राह्ण धरावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे एससीसी बोर्डवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन एससीसी बोर्डचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांना देण्यात आले. कृती समितीच्यावतीने सायबर चौक येथून या मोर्चास दुपारी एक वाजता प्रारंभ झाला. तत्काळ अनुदान मिळालेच पाहिजे, अशा घोषणात देत मोर्चा एससीसी बोर्ड येथे आला. मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना राज्य उपाध्यक्ष रत्नाकर माळी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने आर्थिक अडचणीचे कारण सांगून २००१ पासून राज्यात नवीन शाळांना परवानगी देताना कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रावरील अन्यायी धोरणास सुुरुवात केली. या विरोधात राज्यभर आंदोलन झालीत. त्यानंतर ‘कायम’ शब्द वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, कायम विनाअनुदान तत्त्व सुरू करताना पहिली ते बारावीसाठी लागू केले पण ‘कायम’ शब्द वगळताना फक्त पहिली ते दहावीचा काढून इयत्ता अकरावी व बारावीचा ‘कायम’ शब्द तसाच ठेवला. याबाबत पुन्हा आंदोलन झाले. त्याचा परिणाम म्हणून इयत्ता अकरावी व बारावीचा ‘कायम’ शब्द फेब्रुवारी २०१४ ला वगळण्याचा निर्णय झाला. या शाळांना अनुदान देण्यासाठी आवश्यकता नसतानाही या शाळांचे मूल्यांकन करण्याचा घाट घातला. कारण इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग ती स्वतंत्र शाळा नसून हे वर्ग काही ठिकाणी अनुदानित हायस्कूलला तर काही ठिकाणी अनुदानित महाविद्यालयास जोडलेले आहेत. या हायस्कूल महाविद्यालयांना पूर्वीपासूनच अनुदान सुरू होते व अशा अनुदानित शाळांचे वाढीव वर्गांचे फेरमूल्यांकन करणे व त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यासारखेच आहे. आंदोलनात रामचंद्र खुडे, बाजीराव बरगे, जयसिंग जाधव, निवासी साळुंखे, विलास चौगले, व्ही. व्ही. मस्के, ए. वाय. देशमुख, यु. बी. पाटील, व्ही. आर. जाधव, व्ही. एस. पाटील, बी. एस.कदम, व्ही. डी. वाडकर, प्रिया मोहिते, टी. ए. किरूळकर, बी. बी. रत्नाकर, किरण पाटील, विलास हराळे, दिगंबर बारड, अजित शिर्के, विक्रम नवले यांच्यासह जिल्ह्णातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्य प्रमुख मागण्यामूल्यांकन अपात्र ठरलेल्या शाळांना त्रुटी पूर्तता करणेबाबत आदेश देऊन या शाळांना सुद्धा त्रुटी पूर्तता होतील. त्यानुसार त्यांना तत्काळ १०० टक्के अनुदान सुरू करावे. १९ सप्टेंबर २०१६ चा शासननिर्णय माशामु-२०१६/प्र.क्र. १८/ एसएम -४ तत्काळ रद्द करून पूर्वीचे अनुदान सत्र सुरू ठेवावे.