प्रदेशनिष्ठ गवताला आंबोलीचे नाव, नव्या दोन प्रजातींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:18+5:302021-05-25T04:26:18+5:30

कोल्हापूर : इस्चिमम कुळातील गवताच्या दोन नवीन प्रजातींचा शोध वनस्पती शास्त्रज्ञांनी लावला असून, यातील एका प्रदेशनिष्ठ गवताला सिंधुदुर्ग ...

Territorial grass named Amboli, discovery of two new species | प्रदेशनिष्ठ गवताला आंबोलीचे नाव, नव्या दोन प्रजातींचा शोध

प्रदेशनिष्ठ गवताला आंबोलीचे नाव, नव्या दोन प्रजातींचा शोध

Next

कोल्हापूर : इस्चिमम कुळातील गवताच्या दोन नवीन प्रजातींचा शोध वनस्पती शास्त्रज्ञांनी लावला असून, यातील एका प्रदेशनिष्ठ गवताला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीवरून, तर गोव्यात आढळलेल्या गवताला संशोधकावरून नाव देण्यात आले आहे. ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असे आंबोलीतील गवताला नाव दिले असून, गाेव्याच्या पठारावर आढळलेल्या गवताच्या नव्या प्रजातीला डॉ. जनार्धमन यांचे नाव दिले आहे.

या नव्या प्रजातीची माहिती असलेला शोधनिबंध न्यूझीलंडच्या फायटोटॅक्सा या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहेे. आजवर आंबोलीमधून अनेक वनस्पती, कीटक, बेडूक अशा विविध घटकांतून नवीन प्रजातींचा शोध लागला असला तरी या परिसराचे नाव वनस्पतीला प्रथमच दिल्याने आंबोलीचा सन्मान झाला आहे.

इस्चिमम कुळातील गवताचे सर्वाधिक प्रकार पश्चिम घाटातच आढळतात. एकूण ८१ पैकी ६१ प्रजातींची नोंद भारतात असून, ७० टक्के गवताचे प्रकार सह्याद्रीच्या परिसरात आढळतात. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील वनस्पती शास्त्रज्ञांना ‘इस्चिमम’ म्हणजेच मुरैना गवताची नवी प्रजात आंबोलीत आढळली. ही प्रदेशनिष्ठ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ज्या परिसरात ती सापडली त्या आंबोलीच्या ठिकाणावरून त्याचे नामकरण केले. या संशोधनाचे श्रेय पुण्यातील डॉ. मंदार दातार, सारंग बोकील, डॉ. शुभदा ताह्मणकर आणि डॉ. रितेशकुमार चौधरी या शास्त्रज्ञांना जाते. यापूर्वीही या संशोधकांनी इस्चिमम कुळातील गवताच्या दोन प्रजातींचा शोध लावला आहे.

आंबोलीत ओढ्याकाठी आढळलेले हे गवत

‘इस्चिमम आंबोलीएन्स’ हे गवत आंबोली घाटाच्या पायथ्याशी एका ओढ्यामध्ये आणि तेथील भाताच्या खाचरांमध्ये आढळले. २०१७ पासून या संशोधकांनी पश्चिम घाट, गोवा, कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर येथून या कुळातील गवताचे नमुने जमा केले. त्यांचा डीएनए तपासला. वंशावळ पाहिली. त्यात गाेव्याच्या पठारावर आणि आंबोलीत आढळलेल्या गवताच्या दोन नव्या प्रजाती नव्या असल्याचे आढळल्या. त्यातील एका गवताच्या प्रजातीला डॉ. जनार्धमन यांचे, तर दुसऱ्या प्रजातीला आंबोलीचे नाव दिले, अशी माहिती डॉ. मंदार दातार यांनी दिली.

--------------------------

कोट

खाद्य गवतांच्या जातीपैकी पवन्या, मारवेल हे गवत अत्यंत आवश्यक आहे. भारतीय उपखंड या गवतांनी समृद्ध आहे. हे दोन्ही गवत दूध उत्पादनासाठी चांगले आहेत; पण अनेकदा मारवेलला फुले येऊन त्याच्या बिया होण्यापूर्वीच जनावरे खातात. त्यामुळे त्यांचे परागीभवन होत नाही. म्हणून त्याविषयी जनजागृती व्हायला हवी. बिया होऊन खाली पडल्यानंतर ते गवत खाण्यासाठी मोकळे केले पाहिजे, तरच त्याचे परागीभवन होईल.

- डॉ. मंदार दातार,

वनस्पती शास्त्रज्ञ, आघारकर संशोधन संस्था, पुणे

----------------------------

कोट

आपण जे अन्न खातो यापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पती या गवतवर्गीय आहेत; पण दुर्दैवाने गवताळ भूप्रदेशांना आपण पडीक, दुर्लक्षित जमीन समजतो; पण या पडजमिनीवर वैशिष्टपूर्ण वनस्पतींची विविधता आढळून येते. याच जमिनीवर गवताचे निर्मूलन करून मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात येत आहे. ही बाब चिंताजनक आहे. जैव विविधतेने समृद्ध आंबोलीमध्ये ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ ही गवताची नवीन प्रजात सारंग बोकील, मंदार दातार, रितेश कुमार चौधरी व शुभदा ताह्मणकर यांनी शोधून काढली, ही गौरवाची बाब आहे.

--सुहास वायंगणकर,

सदस्य, राज्य जैवविविधता मंडळ, कोल्हापूर.

------------------------

24052021-kol-amboli gawat

24052021-kol-amboli gawat1

जैव विविधतेने समृद्ध आंबोलीमध्ये ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ ही गवताची नवीन प्रजात आढळली आहे.

===Photopath===

240521\24kol_4_24052021_5.jpg

===Caption===

24052021-kol-amboli gawat24052021-kol-amboli gawat1जैव विविधतेने समृद्ध आंबोलीमध्ये ‘इस्चिमम आंबेालीएन्स’ ही गवताची नवीन प्रजात आढळली आहे. 

Web Title: Territorial grass named Amboli, discovery of two new species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.