महापालिकेत आता दोन अतिरिक्त आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:21+5:302021-07-02T04:16:21+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत यापुढे दोन अतिरिक्त आयुक्त असतील. या आधी एक अतिरिक्त आयुक्त राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर दिले जात ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत यापुढे दोन अतिरिक्त आयुक्त असतील. या आधी एक अतिरिक्त आयुक्त राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर दिले जात होते. आता यापुढे स्थानिक सेवाज्येष्ठतेनुसार एक अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्याचा राज्य सरकारने बुधवारी निर्णय घेतला आहे.
राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांच्या हद्दीतील लोकसंख्या सतत वाढत असून, त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. शिवाय कोरोनासारख्या महामारीमुळे तर कामाचा ताण अधिकच वाढला आहे. त्यामुळे ज्या महापालिकांची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे आहे, अशा महापालिकेत एक जादा अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह दहा महापालिकांना आता जादा अतिरिक्त आयुक्त मिळणार आहेत.
एक अतिरिक्त आयुक्त राज्य सरकारतर्फे प्रतिनियुक्तीवर दिला जाईल, तर दुसरे अतिरिक्त आयुक्त हे स्थानिक पातळीवर पदोन्नतीने नियुक्त करायचे आहेत. त्यांचा पगार व इतर खर्च महापालिका प्रशासनाने करायचा आहे.