आजच्या काळात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:45 AM2021-02-18T04:45:45+5:302021-02-18T04:45:45+5:30

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. वेळ, पैसा, श्रम इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्याकरिता वधू-वर मेळावे गरजेचे ...

There is a great need for bridal parties these days | आजच्या काळात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज

आजच्या काळात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज

googlenewsNext

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. वेळ, पैसा, श्रम इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्याकरिता वधू-वर मेळावे गरजेचे आहेत, असे प्रतिपादन वीरशैव समाजाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. कोल्हापूर वीरशैव समाजातर्फे अक्कमहादेवी मंडपात आयोजित वधू-वर मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे होते.

झपके म्हणाले, वीरशैव समाजाने गेल्या ३२ वर्षांपासून सातत्याने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या मेळाव्यात १६५ युवक व २०३ युवतींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांचा समाजभूषण व वसंतराव सांगवडेकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेच्या उपाध्यक्षा रंजन तवटे, नानासाहेब नष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश पाटील चंदुरकर यांनी प्रास्ताविक केले. नंदा बेंद्रे यांनी सूत्रसंचालन व राजू वाली यांनी आभार मानले.

फोटो : १७०२२०२१-कोल-वीरशैव

आेळी : कोल्हापुरात वीरशैव समाज वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. यावेळी सुनील गाताडे, अशोक स्वामी, राजू वाली, नानासाहेब नष्टे, अनिल सोलापुरे, राजेश पाटील, उमा बनछोडे, अलका स्वामी, रंजना तवटे आदी उपस्थित होते.

Web Title: There is a great need for bridal parties these days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.